चीनमध्ये मुली आता लग्नाशिवाय आई होऊ शकतात. चीन सरकारने देशातील महिलांना हा अधिकार दिला आहे. तथापि, आत्तापर्यंत हा कायदा केवळ नैऋत्य सिचुआन प्रांतात पायलट प्रोजेक्ट म्हणून लागू करण्यात आला आहे. संपूर्ण चीनमध्ये त्याची अंमलबजावणी करायची की नाही याबाबत अजून निर्णय झालेला नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमधील महिलांनी लग्नाशिवाय आई बनण्यासाठी कायदा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली होती. या विषयावर डॉक्टर, कायदेतज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांची मते घेत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत ज्या तरुणांना लग्नाशिवाय मुले हवी आहेत त्यांना कायद्यातून दिलासा मिळणार आहे. नोकरदार तरुणांना लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
यासंदर्भात १५ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू होणार आहे. मूल होऊ इच्छिणारे कोणीही सिचुआन प्रांतात नोंदणी करू शकतात. एवढेच नाही तर नवीन कायद्यात मुलांच्या संख्येवर मर्यादा नाही. यापूर्वी लोकसंख्या वाढल्याने सरकारने चीनमध्ये एक मूल धोरण आणले होते. त्यामुळे येथे जन्मदर कमी होऊ लागला. त्यानंतर सरकारला असा निर्णय घ्यावा लागला.