मागील महिन्यापासून चीन मध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. नियमित PCR चाचण्या आणि झीरो कोविड धोरण रद्द केल्याने अजूनच कोविड चे संक्रमण वाढत आहे.
अमेरिका, दक्षिण कोरिया, भारत, इटली, जपान आणि तैवान या सर्व देशांनी प्रतिसाद म्हणून चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड चाचण्या सक्तीच्या केल्या आहेत.जागतिक आरोग्य संघटनेला चीनमधील संसर्गाच्या नवीनतम वाढीचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक माहितीची आवश्यकता आहे, असे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले.