आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात सांगितले की, विशाखापट्टणम ही आंध्रप्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिल्लीतील इंटरनॅशनल डिप्लोमॅट अलायन्सच्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली आहे . मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी म्हणाले की, येत्या काही दिवसांत ते देखील विशाखापट्टणमला शिफ्ट होणार आहेत. त्यांनी कार्यक्रमात उपस्थित लोकांना देखील विशाखापट्टणमला भेट देण्याचे निमंत्रण दिले.
कार्यक्रमात ते म्हणाले, ‘मी तुम्हाला विशाखापट्टणमला भेट देण्याचे निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. आगामी काळात विशाखापट्टणम ही आपली राजधानी असेल. येत्या काही महिन्यांत मी विशाखापट्टणमलाही शिफ्ट होणार आहे.