अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडन यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी चीनकडून राबवल्या जात असलेल्या पद्धतींपाहून अमेरिका खूप चिंतेत आहे.
राष्ट्रपतींना पत्रकारांनी विचारले की त्यांना चीनमधील कोविड संसर्गाच्या परिस्थितीबद्दल काळजी वाटते का, त्यावर त्यांनी “होय” असे उत्तर दिले. चीनमध्ये कोविड महामारीच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने अमेरिका आणि भारतासह अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले आहेत असे त्यांनी पत्रकारांनां बोलताना सांगितले .
राष्ट्रपती जो बाइडन म्हणाले की , “तुम्ही चीनमधून येत असाल तर तुमची संपूर्ण चौकशी व कोविड चाचणी झालीच पाहिजे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी पत्रकारांना सांगितले की, कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र खूप वेगाने पसरत असताना, चीनसारख्या मोठ्या आणि अफाट लोकसंख्येच्या देशात कोविड व्हायरसचे अनेक प्रकार निर्माण येण्याचीही दाट शक्यता आहे.
त्यातच , वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ( WHO ) असे म्हणे आहे की चीन कोविड रुग्णांची संख्या नीट सांगत नाही आहे .