प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला इजिप्तचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी हे भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार,राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांच्यासोबत त्यांचे सहकारी पाच मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील असणार आहे . इजिप्तच्या राष्ट्रपतींना प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये इजिप्तच्या लष्कराची तुकडीही सहभागी होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.