सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. नोटाबंदीविरोधात दाखल सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे नोटाबंदीचा वाद आता पूर्णपणे संपुष्टात आला आहे. केंद्र सरकारचा नोटबंदीचा निर्णय मागे घेण्याचे कोणतेही कारण नाही, व आता हा निर्णय मागे घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नोटाबंदीपूर्वी केंद्र सरकारने सर्व महत्त्वाच्या विभागांशी चर्चा केली होती, सर्वांची संमती घेऊनच हा निर्णय जाहीर करण्यात आला होतो असे कोर्टाने निर्णयात सांगितले आहे .