तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने गुरुवारी नेक्स्ट जेन चिप्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले. अमेरिका आणि चीन मध्ये चाललेल्या तंत्रज्ञान युद्धात तैवान ने आपले स्थान बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतला.
पुढील येणारी आधुनिक उपकरणे, मोबाइल फोन ते सुपर कॉम्प्युटर पर्यन्त इंटरनेट सर्वर कंट्रोल करण्यापर्यंत ही चिप्स काम करतील.
कमी क्लाउट स्मार्ट असलेल्या कंपन्या चीनच्या अर्थव्यवस्थेवर यूएस निर्बंधांच्या प्रभावामुळे मंदीची भीती व अनिश्चितते मध्ये गेल्या असताना TCMC नेक्स्ट जनरेशन चिप्स चे उत्पादन वाढवत आहे. TSMC ने यावर्षी त्याच्या भांडवली खर्चाच्या योजना किमान 10% ने कमी करून $36 अब्ज केल्या आहेत. याचा कंपनीच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
गुरुवारी, TSMC चे अध्यक्ष मार्क लिऊ यांनी येणाऱ्या काळात चिप ची मागणी वाढेल व २ नॅनो मीटर इतक्या छोट्या चिप चे उत्पादन देखील TSMC सुरू करेल असे सांगितले. “सेमीकंडक्टर उद्योग पुढील दशकात वेगाने वाढेल आणि तैवान निश्चितपणे जागतिक अर्थव्यवस्थेत आणखी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, 3nm (नॅनो मीटर) चिप्सची मागणी खूप चांगली आहे. असे लिऊ म्हणाले.
जगातील आघाडीच्या चिप्सच्या उत्पादन क्षमतेच्या 90% पेक्षा जास्त क्षमता तैवानमध्ये आहे. जागतिक धोरण निर्माते आणि ग्राहक चीनसोबत सावधगिरी चे धोरण स्वीकारत आहेत. चीन ने तैवान ला संपवण्याची धमकी दिल्याने TSMC ला काही कारखाने इतर देशात हलवण्यास भाग पडले आहे.
तैवान जर्मनी, जपान किंवा अमेरिका येथे कारखाने काढून 3nm च्या उच्च कार्यक्षमता असलेल्या चिप बनवण्यासाठी विचार करत आहे.
सर्वात प्रगत 2nm चिप्सचे उत्पादन करण्याची TSMC ची योजना ही चिपमेकिंग कंपन्यांनी इतर देशांमध्ये ण नेता तैवान मध्येच बनवण्याचे ठरवले आहे. TSMC ने सांगितले की त्याची 3nm च्या चिप 5nm चिप्सपेक्षा चांगली कामगिरी देतात, तर सुमारे 35% कमी पॉवर लागते. 3nm तंत्रज्ञान पाच वर्षांत $1.5 ट्रिलियनच्या बाजार मूल्यासह अंतिम उत्पादन तयार होईल.