कोलकाता येथे राष्ट्रीय गंगा परिषदेची दुसरी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आज सकाळी अहमदाबादमध्ये त्यांची आई हीराबेन यांचे निधन झाल्या नंतर पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहिले. गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या प्रदूषण प्रतिबंध आणि पुनरुज्जीवनाची संपूर्ण जबाबदारी परिषदेला देण्यात आली आहे.
एनजीसीच्या बैठकीत गंगा आणि तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला गेला. गंगा नदीच्या पाण्याच्या शुद्धतेची चाचणी चा रीपोर्ट बघितला गेला. त्यासोबतच गंगा नदीचा प्रवाह निर्मळ आणि अखंडित करण्याचा संकल्प केला. आढावा बैठकीत गंगा उगमस्थानापासून ते बंगालच्या उपसागरात विलीन होईपर्यंत प्रवाहाच्या पाण्याचा चाचणी अहवाल ठेवण्यात येणार आहे. गंगा आणि तिच्या उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्रासोबत राज्यांच्या सहकार्याचा आढावा झाला.
या बैठकीला उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांशिवाय परिषदेचे सदस्य असलेले जलशक्ती मंत्री आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित होते.