नेपाळमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. या अपघातग्रस्त विमानात 72 जण होते. विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. विमान अपघातात आतापर्यंत १३ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पोखराजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त विमान यति एअरलाईन्सचे असल्याचे सांगितले जात आहे.