रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जाहीर केले आहे, की ते 1 जानेवारी 2023 रोजी ऑनलाइन पेमेंट फ्रॉड रिपोर्टिंग मॉड्यूल दक्ष वर स्थलांतरित करत आहोत. दक्ष ही आधुनिक आणि स्वयंचलित प्रणाली आहे. तक्रार सुलभ करण्यासाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि हा निर्णय घेण्यात आला आहे. यात तक्रारीवरची कारवाई सुद्धा स्वयंचलित होणार आहे.
“पेमेंट फ्रॉडची तक्रार करण्यासाठी आत्ताच्या बल्क अपलोड सुविधेव्यतिरिक्त, DAKSH मध्ये अधिक सुविधा आहेत, उदा. मेकर-चेकर सुविधा, ऑनलाइन स्क्रीन रिपोर्टिंग, अतिरिक्त माहितीदेण्याचा पर्याय, अलर्ट/ मदत करण्याची सुविधा, डॅशबोर्ड आणि रिपोर्ट तयार करणे इत्यादी, ”आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
सर्व RBI-अधिकृत पेमेंट सिस्टम ऑपरेटर (PSOs) आणि भारतात असलेल्या पेमेंट सिस्टम देणाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक डेटा सबमिशन पोर्टल (EDSP) द्वारे सर्व पेमेंट फसवणुकीची तक्रार करणे आवश्यक आहे.
यामध्ये ग्राहक आणि बँका यांनी फसवणुकीचे प्रकार द दक्ष प्लॅटफॉर्म वर करायचे आहेत. कितीही रुपयांची फसवणूक असली तरी.
RBI नुसार, बँक/PPI जारीकर्ता/क्रेडिट कार्ड देणाऱ्या करणार्या NBFCs, ज्यांचे जारी केलेले पेमेंट इन्स्ट्रुमेंट फसवणुकीत वापरले गेले आहे, नोंदवलेले पेमेंट फसवणूकीचे व्यवहार सबमिट करण्याची जबाबदारी आहे. जर पेमेंट फसवणूक झाली तर तक्रार देण्याची जबाबदारी डेबिट/क्रेडिट कार्ड देणारी बँक/NBFC किंवा ज्या पेमेंट इन्स्ट्रुमेंट वरून व्यवहार झाला आहे त्यांची जबाबदारी असेल.
शिवाय, RBI चे असेही म्हणणे आहे की, वैयक्तिक व्यवहाराच्या आधारावर बँकेला तक्रार देण्यापूर्वी, सत्यता आणि पूर्ण सुनिश्चित करण्यासाठी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या सिस्टममध्ये नोंदवलेल्या पेमेंट फसवणुकीची माहिती वेरिफाय करणे आवश्यक आहे.
“DAKSH मध्ये 01 जानेवारी 2023 पासून पेमेंट फ्रॉड रिपोर्टिंग लाइव्ह झाल्यानंतर, संस्था EDSP मध्ये कोणत्याही पेमेंट फसवणुकीची तक्रार करू शकणार नाहीत. बँका 31 डिसेंबरपर्यंत EDSP मध्ये नोंदवण्यात आलेल्या पेमेंट फ्रॉड अपडेट करणे आणि बंद करणे सुरू ठेवू शकतात. रिझर्व्ह बँक त्यानंतर जून डेटा EDSP वरून DAKSH मध्ये ट्रान्सफर करेल.