जम्मू काश्मीर मधील दहशतवादी ईकोसिस्टिम संपवण्याची गरज – गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सरकारच्या दहशतवादाबाबतच्या झीरो टोलेरेन्स या धोरणावर भर दिला आणि दहशतवादाची संपूर्ण ईको सिस्टिम संपवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा आणि विकास आव्हानांवर गृह मंत्रालय (MHA) आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह चर्चा करण्यासाठी आढावा बैठक घेतली.

अलिकडच्या काही महिन्यांत जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, ज्यात नागरिक आणि सुरक्षा जवानांवर हल्ले आणि घुसखोरीच्या प्रयत्नांचा समावेश आहे.

गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राबविण्यात येत असलेल्या अनेक विकास कामांचाही आढावा घेतला आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला. शहा यांनी अधिकार्‍यांना “अनेक योजनांतर्गत लाभार्थ्यांची 100 टक्के कव्हरेज मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि विकासाचे फायदे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतील याची खात्री करा” असे निर्देश दिले.

Leave a Comment

Your email address will not be published.