केंद्रीय अर्थसंकल्प 2023 च्या नवीन तरतुदींनुसार मोबाईल फोन आणि टीव्ही स्वस्त होणार आहेत. कॅमेरा लेन्सही स्वस्त होतील. यासोबतच इलेक्ट्रॉनिक वाहनेही स्वस्त होणार आहेत.अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्र्यांनी सांगितले की 2022-2023 साठी सुधारित वित्तीय तूट जीडीपीच्या 6.4% आहे. 2023-2024 साठी वित्तीय तूट GDP च्या 5.9% असण्याचा अंदाज आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, चालू वर्षासाठी आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 7% असण्याचा अंदाज आहे, जो जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे.