भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2023) सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा नरेंद्रजी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने सर्वच घटकांची काळजी अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत, तर काही वस्तू महागही झाल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘कस्टम ड्युटी, सेस, अधिभार दर बदलण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी सांगितले की , “भारतीयांचे दरडोई उत्पन्न गेल्या काही वर्षांत दुप्पट झाले आहे. सध्या दरडोई उत्पन्न वार्षिक 1.97 लाख रुपये आहे. भारताची अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे, त्याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावर दिसून येत आहे.
आता जाणून घेऊया काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले.
महाग
सिगारेट
सोने आणि प्लॅटिनम वस्तू
चांदीचे दागिने आणि भांडी
रबर
इलेक्ट्रिक चिमणी
तांबे
कपडे
स्वस्त
खेळणी
सायकल
इलेक्ट्रिक वाहन
मोबाईल , एलईडी टिव्ही ( LED TV )
कॅमेरा लेन्स
बायोगॅसशी संबंधित गोष्टी