केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथे महासंकल्प रॅलीला संबोधित केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला शाह यांनी भूमीला आणि तेथील शूर आदिवासी नेत्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी गृहमंत्र्यांनी हेमंत सोरेन सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी सांगितले कि सध्याची राजवट आदिवासीविरोधी असून राजकीय फायद्यासाठी झारखंडचा नाश करत आहे, असा दावा त्यांनी केला. विकास आणि कल्याणकारी योजनांच्या नावाखाली खोटी आश्वासने देऊन आदिवासींची कशी फसवणूक झाली आहे, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
ते म्हणाले, “मुख्यमंत्री हेमंत सोरेन आदिवासी आहेत पण हे सरकार आदिवासीविरोधी आहे. झारखंडमध्ये सध्याच्या कार्यकाळात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे, जमीन बळकावणारे सक्रिय आहेत आणि मुख्यमंत्री आपली एकही जबाबदारी पार पाडत नाहीत. आज झारखंडमध्ये आदिवासी महिलांचे जबरदस्तीने लग्न केले जात आहे. आणि त्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. अन्न, रोजगार आणि शिक्षणाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात आहे. तुम्ही तुमच्या व्होट बँकेचे राजकारण करत आहात, त्यासाठी तुम्हाला माफ केले जाणार नाही. व्होट बँकेचा लोभ आदिवासींच्या हिताच्या वर असू शकत नाही.
झारखंडमधील जनता जागी झाली असून आता हा अन्याय सहन केला जाणार नाही, असे शाह म्हणाले. अमित शहा पुढे म्हणाले, नोकऱ्या देण्याची हिम्मत नसेल तर खुर्ची सोडा. झारखंडमध्ये नोकऱ्या देण्याचे काम भाजप करेल. रघुबर दास यांच्या राजवटीत भाजपने शिक्षणाच्या व प्रत्येक क्षेत्रात काम केले आहे. रस्ते असो की वीज असो आमच्या नंतर आलेल्या सरकारने झारखंडला उद्ध्वस्त केले. आम्ही आदिवासी कल्याणासाठीचे बजेट 86,000 हजार कोटी रुपये केले आणि एक कोटी आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी दिले.
समारोपात गृहमंत्री शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाकडे वाटचाल करेल, अशी ग्वाही दिली. यावेळी झारखंडची जनता बदल घडवून आणणार आहे आणि अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकारला हाकलून देणार आहे अशा देखील व्यक्त केली .