भारतीय हवाई दलातील पायलट अवनी चतुर्वेदी रचनार इतिहास

भारतीय हवाई दलातील पायलट अवनी चतुर्वेदी नवा इतिहास रचण्याच्या खूप जवळ आहेत. पायलट अवनी चतुर्वेदी व हवाई दलातील तीन महिला वैमानिक देशाबाहेर आयोजित करण्यात येणाऱ्या हवाई युद्ध खेळात ( एरियल वॉर गेम ) भारतीय लष्करी तुकडीचा भाग म्हणून सहभागी होणार आहेत. हि ऐतिहासिक कामगिरी करणारी अवनी पहिली महिला पायलट ठरणार आहे. अवनी यांच्या नावावर यापूर्वीही अनेक इतिहास आहेत.

भारतीय हवाई दल प्रथमच स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदी सुखोई (Su-30MKI) लढाऊ विमान उडवणार आहे. परदेशी भूमीवर सुखोई उडवणारी अवनी ही पहिली महिला वैमानिक ठरणार आहे. विदेशी धरतीवर युद्धसरावासाठी तीन महिला लढाऊ वैमानिकांध्ये अवनी चतुर्वेदी यांची निवड झाली आहे

Leave a Comment

Your email address will not be published.