पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी माजी लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यावर खूप गंभीर आरोप केला आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत इम्रानने म्हटले आहे की, माजी लष्करप्रमुख बाजवा यांना त्यांची हत्या करायची होती. त्यांच्या हत्येनंतर पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू करण्याची त्यांची योजना होती, असा दावाही माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बाजवा यांच्यावर असे आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. इम्रान खान यांची सत्ता जाण्यास देखील ते माजी लष्करप्रमुख बाजवा यांनाच जबाबदार धरतात. अमेरिकेच्या कट- कारस्थानात बाजवा यांचाही सहभाग होता, असे ते म्हटले.
या आरोपांवर माजी लष्करप्रमुख बाजवा यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.