देशात डिजिटल पेमेंटचा एक मोठा ट्रेंड सध्या सुरू आहे आणि त्याची झलक UPI पेमेंटचे आकडे पाहूनही दिसून येते आहे . डिसेंबरमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ( UPI ) द्वारे विक्रमी 12.82 लाख कोटी रुपये भरले गेले. दरम्यान त्यांच्या व्यवहाराचा आकडा 782 कोटींवर पोहोचला आहे.
डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने सोमवारी ट्विट केले व त्यात त्यांनी म्हटले आहे कि , “यूपीआयने (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) देशातील डिजिटल पेमेंट क्रांतीमध्ये मोठे योगदान दिले आहे. डिसेंबर 2022 मध्ये UPI व्यवहार 782 कोटींवरून 12.82 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहेत.”
UPI चे चलन वाढण्यामागेची कारणे
देशात UPI चे चलन वाढण्यामागे अनेक कारणे आहेत . यामध्ये लोक UPI द्वारे कॅशलेस पेमेंट आणि व्यवहार सहज करू शकतात. UPI द्वारे, एक वापरकर्ता स्वतंत्र प्रोफाइल तयार न करता अनेक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो.वापरायला खूप सहज सोपे आहे . मोठ्या प्रमाणात लोक देखील आता डिजिटल मनी बदल जागरूक झाले आहेत .