दिल्ली मधील वायुप्रदूषण हानिकारक श्रेणीत आल्याने एअर क्वालिटी मॅनेजमेंट आयोगाने (CAQM) शुक्रवारी दिल्ली एनसीआरमध्ये महत्वाचे प्रोजेक्ट वगळता बांधकाम व बांधकाम पाडण्यावर तत्काळ बंदी घोषित केली.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, “गंभीर पातळीचे वायू प्रदूषण आजारी तसेच निरोगी लोकांवर देखील लोकांवर परिणाम करते. CPCB च्या दैनिक अधिकृत बुलेटिननुसार, शुक्रवारी दिल्लीचा 24 तासांचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 399 धोक्याच्या पातळी पर्यंत आला होता.
301 ते 400 मधील AQI ला ‘खूप खराब’ आणि 401 आणि 500 मधील हवेला ‘गंभीर’ म्हणले जाते. शांत वारा आणि स्थिर वातावरणीय स्थितींमुळे दिल्लीचा एकूण AQI ‘गंभीर’ श्रेणीत घसरण्याची अपेक्षा आहे. CAQM नुसार, वायुप्रदूषण थांबवण्यासाठी अजून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
GRAP चा बांधकामावरील बंदी हा ग्रेडेड रिस्पॉन्सॲक्शन प्लॅन (GRAP) च्या ‘स्टेज III’ अंतर्गत येतो. GRAP हा वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणीबाणीच्या उपाययोजनांचा संच आहे.