चीनने LAC चे करार मोडले: एस जयशंकर

Line Of Actual Control (LAC) बदलण्याचा प्रयत्न केल्याबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी चीनवर टीका केली.

ऑस्ट्रियन ZIB2 पॉडकास्ट आणि ORF टेलिव्हिजनच्या दैनिक न्यूज मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर म्हणाले, “LAC बदल न करण्याचा आमचा करार होता, जो त्यांनी मोडण्याचा प्रयत्न केला आहे.

LAC च्या पश्चिमेकडील गलवान व्हॅली आणि पॅंगॉन्ग सरोवर, अलीकडच्या वर्षांत बातम्यांमध्ये झळकले होते. पूर्वेकडील तवांग हे चीन च्या विस्तारवादी धोरणामुळे चर्चेत आले होते.

“आम्हाला चीन बद्दल असे अनुभव आलेत आणि चिंतेची बाब अशी की आम्ही आमचे सैन्य LAC वर तैनात न करण्याचे करार केले आहेत. आणि चीन ते करार सातत्याने मोडत आहे म्हणून सध्या आमच्याकडे तणावपूर्ण वातावरण आहे.” एस जयशंकर

अलीकडेच, भारत आणि चीनने 20 डिसेंबर रोजी Chushul-Moldo चीन मध्ये सीमा बैठक कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची 17 वी फेरी झाली. त्यात पश्चिम सेक्टरमध्ये जमिनीवरील सुरक्षा आणि स्थिरता राखण्यासाठी संमती दर्शवली गेली.

चीन परिस्थिती बदलण्यासाठी करार पालन न करण्याचा आरोप भारताला देऊ शकतो पण सैटेलाइट फोटोज मध्ये स्पष्ट दिसत आहे की कोणी करार मोडले आहेत.

आता परदर्शित इतकी आहे की सैटेलाइट फोटोज तुमच्याकडे पण आहेत रेकॉर्ड अगदी स्पष्ट आहे. तुम्ही ते फोटोज पाहिलेत तर तुमचे तुम्हाला कळून जाईल की नियम करार कोणी मोडले आहेत ते. एस जयशंकर

Leave a Comment

Your email address will not be published.