मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी फेब्रुवारी पर्यन्त मध्यप्रदेश मध्ये चित्ता पर्यटन सुरू होईल अशी आशा व्यक्त केली. तब्बल ७५ वर्षानंतर भारतीय जंगलांमध्ये दिसणार आहे. मध्यंतरी चित्ते भारतीय हवामानाशी जुळवावून घेतील का नाही शंका व्यक्त केली जात होती. आता त्यांनी भारतीय परिस्थितीशी उत्तम प्रकारे जुळवून घेतले आहे. ते आता शिकार करत आहेत.
तीन महिन्यांपूर्वी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांचे स्थलांतर केल्यानंतर त्यांना काही काळ अलिप्त ठेवले होते. आता शिकार करत असल्याने त्यांना जंगलात सोडण्यात येईल. त्यामुळे फेब्रुवारी मध्ये कुनो नॅशनल पार्क मध्ये चित्ते सामान्यांना पाहायला मिळतील.
एकदा चित्यांना जंगलात सोडल्यानंतर, सामान्यांना भारतात प्रथमच चित्ता पर्यटन अनुभवण्याची संधी मिळेल. राज्य सरकारने नवीन योजना आहे की स्थानिक आदिवासी गावे आणि त्यांची संस्कृती आणि परंपरा प्रसिद्धीच्या झोतात आणण्याची त्यांची योजना आहे. आणि ते होमस्टेच्या माध्यमातून साध्य करण्याचा विचार करत आहेत.