पंजाबमधील पाकिस्तान सीमेजवळ बीएसएफने एका बांगलादेशी नागरिकाला पकडले असून त्याच्याकडून कोणतीही आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आली नाही आहे . बीएसएफने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात सांगितले की, 5 जानेवारीच्या रात्री उशिरा, रोरांवाला खुर्द गावाजवळ तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी सीमेच्या कुंपणाकडे एका नागरिकाची हालचाल पाहिली.जवानांनी त्या व्यक्तीला थांबवले आणि चौकशीत ती व्यक्ती बांगलादेशची नागरिक असल्याचे निष्पन्न झाले.
पुढे, चौकशीदरम्यान त्या व्यक्तीने स्वताचे नाव महमूद आलम तुलू असल्याचे सांगितले, तो मदारीपूरचा असून तो अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात जाण्यासाठी भारतात आला होता. त्याच्याकडे भारतात जाण्यासाठी सहा महिन्यांचा व्हिसा असलेला बांगलादेशी पासपोर्ट होता, पण पाकिस्तानात जाण्यासाठी त्याच्याकडे व्हिसा नव्हता. तो विवाहित असून त्याचे कुटुंब पाकिस्तानात राहते असा त्याने खुलासाही केला आहे.
चौकशीदरम्यान तो नकळत सीमेजवळ पोहोचल्याचे समोर आले आहे . त्याच्याकडून काहीही आक्षेपार्ह सापडलेले नाही, असे निवेदनात सांगण्यात आले आहे . प्रवक्त्याने सांगितले की, या व्यक्तीकडे बांगलादेशी पासपोर्ट आणि सहा महिन्यांचा वैध भारतीय व्हिसा आहे. तो बांगलादेशातील मदारीपूरचा रहिवासी असून पाकिस्तानात जाण्यासाठी पंजाबमधील अटारी सीमेवरून भारतात आल्याचे त्याने सांगितले.