भारत पे चे सीईओ सुहेल समीर यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. समीर यांचे कंपनीचे माजी संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांच्याशी वाद असल्याचीही चर्चा सध्या होत आहे .
माहिती देताना भारतपे म्हणाले की मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुहेल समीर हे 7 जानेवारीपर्यंत धोरणात्मक सल्लागार म्हणून कार्यरत राहतील. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की , सध्याचे मुख्य वित्तीय अधिकारी नलिन नेगी यांची कंपनीचे अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीचा व्यवसाय मजबूत करण्यासाठी सर्व भागीदारांच्या संमतीने नलिन नेगी यांना अंतरिम सीईओ म्हणून निवड करण्यात आली आहे.
भारत पे बोर्डाचे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले की, भारत पे ही भारतातील आघाडीची कंपनी बनवल्याबद्दल आणि अनेक आव्हाने हाताळल्याबद्दल बोर्डाच्या वतीने आम्ही सुहेल समीरचे आभार मानतो .