21 जानेवारी रोजी राम रहीमची रोहतक तुरुंगातून पॅरोलवर सुटका झाली. मात्र, त्यांच्या तुरुंगातून सुटकेवर विरोधकांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत . यापूर्वी देखील डेरा प्रमुखाला गेल्या नोव्हेंबरमध्ये पॅरोल मिळाला होता. आता त्याला पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. यामुळे विरोधक सरकारला अनेक प्रश्न विचारून कोंडीत पकडू पाहत आहेत . राम रहीमला त्याच्या दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आपल्या जामीन अर्जात डेरा प्रमुखाने म्हटले आहे की, 25 जानेवारी रोजी माजी डेरा प्रमुख शाह सतनाम सिंग यांच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहायचे आहे.
शनिवारी पॅरोलवर सुटलेला डेरा प्रमुख त्याच्या बागपत येथील बरनावा आश्रमात गेला होता.त्या आश्रमातील डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये राम रहीम ‘पाच वर्षांनंतर असा उत्सव आला आहे’ असे म्हणताना ऐकू येत आहे. म्हणूनच मी किमान पाच केक कापले पाहिजेत. हा फक्त पहिला केक आहे असे म्हणत आहे .
शस्त्रास्त्र कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे दाखवण्यास मनाई आहे. राम रहीम गेल्या 14 महिन्यांत चौथ्यांदा आणि मागील तीन महिन्यांत दुसऱ्यांदा तुरुंगातून बाहेर आला आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्याला ४० दिवसांचा पॅरोल मिळाला होता. त्यांची तुरुंगातून सुटका हरियाणा निवडणुकीशी निगडीत आहे असे बोले जात आहे . पंजाब आणि हरियाणामध्ये डेरा प्रमुखाचा बराच प्रभाव असल्याचे मानले जाते आणि येथे त्यांचे लाखो अनुयायी आहेत.विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला त्याच्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आणि ऑगस्ट 2017 मध्ये त्याला शिक्षा सुनावली आहे .