भारतात कोरोनाच्या 104 नवीन रुग्णांची नोंद

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत, अशा परिस्थितीत भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात कोविड-19 चे 104 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २,१४९ वर आली आहे. सकाळी आठ वाजता आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोना बाधितांची संख्या 4.46 कोटी (4,46,81,040) आणि मृतांची संख्या 5,30,726 इतकी नोंदवली गेली.

मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण संक्रमित रुग्णांपैकी 0.01 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा दर 98.80 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 78 ने घट झाली आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या ४,४१,४८,१६५ झाली आहे, तर मृत्यूचे प्रमाण १.१९ टक्के नोंदवले गेले आहे.

मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशात आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसीचे 220.17 कोटी डोस देण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. संसर्गाची एकूण प्रकरणे 16 सप्टेंबर 2020 रोजी 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर 90 लाखांवर गेली होती.

19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली होती आणि 23 जून 2021 रोजी ती तीन कोटींच्या पुढे गेली होती. यावर्षी 25 जानेवारी रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे चार कोटींच्या पुढे गेली होती.

Leave a Comment

Your email address will not be published.